Mukhyamantri Yojana Doot Maharashra 2024 :
सद्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत Mukhyamantri Yojana Doot भरती होणार….असल्याचे आपण बरेच दिवसापासून ऐकत आहोत यामध्ये अंतर्गत राज्यात एकूण 50,000 योजना दूत ची भरती करण्यात येणार आहे.
योजना दूत चे काम राज्य सरकारने सुरू केलेल्या सरकारी योजना, या योजनांचा प्रसार, प्रचार आणि लाभार्थ्यांना संपूर्ण माहिती मिळावं यासाठी ही लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे, ही भरती मुख्यमंत्री यांच्या अंतर्गत असून योजना ही मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी लाभार्थ्यांना अर्ज मागवल्या जाणार आहेत, आणि ही भरती चे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करू शकतात, आणि Mukhyamantri Yojana Doot ह्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार जवळपास 300 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि या भरती अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
Yojana Doot कार्यक्रमाची रूपरेषा :
- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्य संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविल्या जाणार आहे. व यातून योजना दूत ची नेमणूक केली जाणार आहे.
- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक अशाप्रमाणे एकूण 50 हजार योजना दुतांची संपूर्ण महाराष्ट्रात निवड करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येक महिन्यासाठी प्रति महिना १० हजार रुपये एवढे मानधन स्वरूपात देण्यात येईल व यात प्रवास खर्च तसेच सर्व भत्ते यांचा समावेश असेल.
- निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री योजना धुत कार्यभारसाठी फक्त सहा महिन्याचा करार केलेला जाणार असेल तर सहा महिन्याच्या व्यतिरिक्त पुढील करार कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.
Whats App
Subscribe
हे पण वाचा
Yojana Doot यांची भुमिका :
- योजना दूत हा संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती गावागावांपर्यंत सूचनेसुसार पोहोचवेल.
- Mukhyamantri Yojana Doot यातून भारती झालेला योजना दूत हा नेमणूक झालेल्या ठिकाणी सक्षम जाऊन सरकारने ठरवून दिलेली कामे पार पाडणे बंधनकारक राहील.
- राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करते वेळेस ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधून शासनाच्या योजना ची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असतील.
- योजना दूत प्रत्यक दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवणे व पुढील दिवसाचा नियोजन तयार ठेवणे.
- योजना दूत सोपवलेल्या जबाबदाऱ्या व स्वतःच्या कामाच्या जबाबदाऱ्या नियमाबाह्य राहून पार पाडतील.
- योजना दूत कार्यक्षेत्रात कार्ये करत असताना गुन्हेगारी तसेच गैरवर्तवणूक करणार नाहीत पण असे काही वर्तणूक आढळल्यास योजना दूत त्यांच्यावर शासनातर्फे कारवाईस जबाबदार राहतील.
Yojana Doot पात्रतेचे निकस :
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- वय १८ ते ३५ वयोगतील असावे.
- शेक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
- संगणक ज्ञान आवश्यक.
- उमेदवारा कडे मोबाइल असणे आवश्यक.
- आधार कार्ड तेही बँक खात्यास लिंक असावे.
Yojana Doot आवश्यक कागदपत्र :
- विहित नमुन्यात केलेला ऑनलाइन अर्ज
- आधार कार्ड
- पदवी प्रमाणपत्र
- अधिवास दाखला
- बँक पासबूक
- पासपोर्ट साइज फोटो
- हमीपत्र
योजनेचा GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
योजनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा .
हे पण वाचा